Belagavi

निवेदन देण्यास गेलेल्या समिती नेत्यांना पोलिसांनी केली अटक

Share

महाराष्ट्र सीमा समन्वयक मंत्र्यांच्या बेळगाव भेटीवर बंदी घालण्यात आल्याने , यासंदर्भात पंतप्रधान आणि भारताच्या गृहमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यास गेलेल्या समिती कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे .

महाराष्ट्रातून येणाऱ्या आमच्या नेत्यांची अडवणूक करू नका या मागणीसाठी , बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले . 144 कलम लागू असताना , अशाप्रकारे निवेदन देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने जमणे चुकीचे असल्याचे कारण देत या सर्व नेत्यांना अटक करण्यात आली आहे .
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून ,समितीच्या जवळपास ४० हुन अधिक नेत्यांसह कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेऊन , पोलीस स्थानकात हजर केले आहे.

यासंदर्भात माजी आमदार तसेच महाराष्ट्र एकीकरण समिती नेते मनोहर किणेकर यांनी या कारवाईचा निषेध व्यक्त करून , मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली.

मध्यवर्ती म. ए. समिती चे प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, मनोहर किणेकर, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके , शिवाजी सुंठकर, आर. एम. चौगुले, सरस्वती पाटील, आर आय पाटील, भागोजी पाटील, शिवाजी मंडोळकर, मनोज पावशे, प्रवीण रेडेकर, ऍडव्होकेट एम. जे .पाटील, मोतेश बार्देशकर, अमर यळ्ळूरकर, सुधीर चव्हाण, चंद्रकांत कोंडुस्कर यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे

Tags:

mes-leaders-arrested-who-went-to-give-memo-to-dc-office/