कागवाड मतदारसंघाचे आमदार श्रीमंत पाटील यांनी कृष्णा नदीकाठच्या जुगुळ आणि मंगावती गावात सुमारे चार कोटी रुपयांची खर्चातून , रस्ते विकास कामांचा आणि मंगावती गावात राष्ट्रीय जलसंवर्धन अभियान प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ केला.

आमदार श्रीमंत पाटील यांनी मंगळवारी जुगुळ गावात देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रस्ते विकासाची कामे सुरु केली. यामध्ये जुगुळ- कागवाड रस्ता विकासासाठी 90 लाख, जुगूळ-शेडबाळ रस्ता विकासासाठी 40 लाख, जुगूळ-शेडशाळ रस्ता विकासासाठी 28 लाख, मंगवती -कागवाड रस्त्याच्या कामासाठी 1.35 कोटी आणि मंगावती गावातील ग्रामस्थांसाठी 94 लाखांचा तसेच जुगुळ गावातील मुस्लिम बांधवांसाठी 25 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. वेचुमडी राष्ट्रीय जल अभियान प्रकल्पांतर्गत घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते पूजाअर्चा करून करण्यात आला.उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून काम पूर्ण करू, असे आश्वासन आमदारांनी दिले.

आमदार श्रीमंत पाटील म्हणाले कि , मी साधा माणूस आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाचेही नुकसान केले नाही, आमदार झाल्यापासून आजपर्यंत पक्ष, मतभेद विसरून जनतेची सेवा केली आहे. सर्व समाज बांधवांनी मला पाठिंबा दिल्याचे सांगून जुगुळ गावातील मुस्लीम मित्रांसाठी शादीमहलच्या उर्वरित बांधकामासाठी मी माझ्या खिशातून पैसे खर्च करणार असल्याचे सांगितले.
जुगुळ गावचे नेते, डीकेएसएस साखर कारखान्याचे संचालक अण्णासाहेब पाटील म्हणाले की, आमदार श्रीमंत पाटील हे साधे-सज्जन राजकारणी आहेत. आमच्या जुगुळ गावात 4 कोटी रु खर्चातून रस्ते व इतर विकासकामे करणारे एकमेव आमदार. ते म्हणाले की, आमदार आणि राजकारण्यांनी आतापर्यंत केवळ आश्वासने दिली.
काका पाटील, विजय अगसर , सुधाकर गणेशवाडी, अरुण गणेशवाडी, अनिल कडोळे, बाबासाहेब पाटील, मंगावती गावचे काळगौडा पाटील, रावसाब पाटील, राजागौडा पाटील, शंकर पाटील, मुस्लिम समाजाच्या अध्यक्षा हमजा गडकरी, सरदार अत्तार, सिकंदर कलावंत, कंत्राटदार बाभळे आदी उपस्थित होते. बी.जे.पाटील, गणेश कांबळे, अधिकारी विराण्णा वाली, अमर मैत्री आदींसह अनेकजण उपस्थित होते.


Recent Comments