Belagavi

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा विशेष पुरस्काराने गौरव

Share

डिजिटल सुरक्षा प्रणालीचा प्रभावी वापर करून धार्मिक सार्वजनिक व्यवस्था गटांमध्ये सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथे गुरुवारी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे संयोजक आशिष ढक्कन, गगन लांबा, नरसिम्हा, विनय मिश्रा यांच्या हस्ते देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, उपअभियंता सुयश पाटील व सीसीटीव्ही कक्षाचे राहुल जगताप यांच्याकडे पुरस्कार प्रदान करण्यात आला .

त्यानिमित्ताने परतीच्या प्रवासा वेळी देवस्थानाचे सचिव शिवराज नाईकवाडी यांची दिल्ली बेळगाव विमान प्रवासादरम्यान बेळगाव विमानतळावर बेळगावकरांनी भेट घेतली . श्री ज्योतिर्लिंग भक्त मंडळ बेळगाव यांच्या वतीने प्राचार्य आनंद आपटेकर यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन तसेच श्री ज्योतिर्लिंग देव दादा सासनकाठी चव्हाट गल्ली बेळगाव यांच्या वतीने फेटा आणि शाल देऊन श्री लक्ष्मण पिराजी किल्लेकर (पुजारी) यांनी सत्कार केला

सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने अध्यक्ष सुनील जाधव यांनी श्रीफळ देऊन सत्कार केला

यावेळी जयवंत काकतीकर , गिरीश पाटील , सुरेश तारिहाळ , गणेश जाधव , दौलत कावळे उपस्थितीत होते

Tags: