सेवेतून वजा केलेल्या अतिथी शिक्षिकेलाच पुन्हा कॉलेजमध्ये नेमण्याची मागणी करत बेळगावातील पं. नेहरू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आज पुन्हा एकदा आंदोलन केले.
बेळगावातील अळवण गल्ली, शहापूर येथील विश्वभारत सेवा समितीच्या पंडित नेहरू पदवीपूर्व कॉलेजमधील एका अतिथी शिक्षिकेला सेवामुक्त करण्यात आले आहे. कोणताही सरकारी आदेश नसताना हे पाऊल उचलल्याचा आरोप करत कॉलेज विध्यार्थ्यानी सुमारे महिन्यापूर्वी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. शिक्षिकेला पुन्हा नेमण्यासाठी विध्यार्थ्यानी महिन्याची मुदत दिली होती. मात्र महिना उलटून गेल्यावरही मागणी मान्य न झाल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी विध्यार्थ्यानी पुन्हा आंदोलन छेडले.

यावेळी बोलताना विध्यार्थी प्रतिनिधी भरमू यांनी सांगितले की, संबंधित अतिथी शिक्षिका विद्यार्थ्यांची पालकांप्रमाणे काळजी घेऊन चांगले शिकवितात. मात्र त्यांना काढून टाकण्याबाबत सरकारचा कसलाही आदेश नसताना कॉलेज प्रशासनाने त्यांना सेवामुक्त केले आहे. हे बेकायदा आहे. या विरोधात आम्ही महिन्यापूर्वी आंदोलन करून महिन्यात शिक्षिकेला पुन्हा नेमण्याची मागणी केली होती. मात्र एक महिना उलटून गेल्यावरही त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलेले नाही. आजही याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. कॉलेज व्यवस्थापन, जिल्हाधिकारी, डीडीपीआय आणि शिक्षणमंत्र्यांनी आमच्या मागणीची दखल घेऊन त्या शिक्षिकेची पूर्ववत नियुक्ती करावी अन्यथा सर्व विध्यार्थी वर्गावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा विध्यार्थ्यानी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिक्षिकेच्या पुनर्नियुक्तीच्या मागणीवर विध्यार्थी असून बसले असून, वर्गावर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिलाय. या पार्श्वभूमीवर शिक्षण खाते काय निर्णय घेते हे पहावे लागेल.


Recent Comments