बेळगाव शहरातील शिवाजीनगर , चौथा क्रॉस येथे , व्यवस्थित आणि वेळेवर पाणी पुरवठा केला जात नसल्याने या भागातील महिला वैतागून गेल्या आहेत . आम्हाला वेळेवर आणि पुरेसा पाणी पुरवठा करा अशी मागणी त्या इन न्यूजच्या माध्यमातून केली आहे .
बेळगाव शहरातील , शिवाजीनगर चौथा क्रॉस येथे व्यवस्थित रित्या पाणी पुरवठा केला जात नाहीय . चार दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जातो परंतु त्याची वेळ देखील निश्चित नाही . पाणी कधीही सोडले जाते . आणि येणारे पाणी कमी दाबाने येत आहे . कधी दहा वाजता , कधी अकरा वाजता पाणी पुरवठा केला जातो . दोन तास पाणी पुरवठा केला जात असला तरी , पाणी कमी प्रेशरने येत असल्याने , ते भरायचे तरी कसे असा प्रश्न महिलांना पडला आहे .

यासंबंधी इथल्या रहिवासी महिलांनी आपली मराठीच्या माध्यमातून , आपल्याला समर्पक आणि वेळेवर पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली आहे.
यावेळी या भागातील महिलांनी रिकाम्या घागरी घेऊन निषेध व्यक्त केला .


Recent Comments