Belagavi

आपत्ती परिस्थिती व्यवस्थापनावर बचाव, मॉक प्रात्यक्षिक

Share

बेळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि एनडीआरएफ यांच्या वतीने आपत्ती परिस्थिती व्यवस्थापनावर बचाव, मॉक प्रात्यक्षिक सोमवारी देसूर येथील बीपीसीएल-आयओसीएल पेट्रोलियम स्टोरेज सेंटर येथे आयोजित करण्यात आले होते.
व्हॉइस ओव्हर : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पेट्रोलियम साठे, पेट्रोलियम वॅगन टँकरची गळती आणि आगीची दुर्घटना यावर नियंत्रणात आणण्यासाठी आणि त्याचे परिणाम कमी करण्यासाठी त्वरीत आणि प्रभावीपणे हाताळण्यासाठी हे मॉक प्रात्यक्षिक करण्यात आले.

बेळगावचे उपविभागीय अधिकारी बलराम चव्हाण व जिल्हा कारखान्याचे उपसंचालक व्यंकटेश राठोडा यांच्या मार्गदर्शनाखाली हे मॉक प्रात्यक्षिक झाले.

अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना घटनास्थळी भेट देऊन अपघात नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देते . या प्रात्यक्षिकात , साठवलेले पेट्रोलियम पाठवत असताना, वॅगन टँकरमधून गळती झाली, ज्यामुळे पेट्रोलियम साठवण सुविधेच्या आत आग लागली असे दाखवण्यात आले . अपघातातातील

२५ जखमी मजुरांना बाहेर काढून प्राथमिक उपचार करण्यात आले तसेच अधिक जखमी झालेल्या 9 जखमींना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णवाहिकेद्वारे तातडीने वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. प्रात्यक्षिक दाखवून ,आपत्ती व्यवस्थापन कार्य पार पडले.

Tags: