Belagavi

कन्नड भाषेचा वापर आणि संवर्धन व्हायला हवे : प्रा . बी एस गवीमठ यांचे मत

Share

आपल्या बहुसांस्कृतिक देशाच्या प्रादेशिक भाषांच्या संरक्षणाच्या दृष्टीने भाषिक राज्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्या दृष्टीने दोन हजार वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेल्या कन्नड भाषेचा वापर व्हायला हवा आणि आणि तिचे संवर्धन व्हायला हवे असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बी. एस. गवीमठ यांनी व्यक्त केले.

बेळगाव जिल्हा कन्नड संघटना कृती समिती, संयुक्त समाज कल्याण संघ आणि नृपतुंगा युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कन्नड साहित्य भवन येथे गडी कन्नड तेरू राज्योत्सव पुरस्कार सोहळा पार पडला . या कार्यक्रमाचे उदघाटन करून बोलताना , प्रा . गविमठ यांनी सांगितले कि , कर्नाटक विद्यावर्धक संघ, कर्नाटक लिंगायत संघटना, ज्यांची स्थापना स्वातंत्र्यापूर्वी झाली. बेळगाव “कर्नाटकात राहण्यासाठी लढलेल्या अनेक सज्जनांचे स्मरण केले पाहिजे . आजही कन्नड अस्मिता टिकवण्यासाठी वडगावचे लोक अनुकरणीय आहेत. बेळगावमधील कन्नड संस्थांना राज्योत्सव साजरा करण्यासाठी अनुदान दिले पाहिजे, असे मत प्रा. बी. एस. गवी मठ यांनी व्यक्त केले .

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ कन्नड कार्यकर्ते आणि माजी नगर सेवक रमेश सोनटक्की म्हणाले, “80 च्या दशकातील गोकाक चळवळ आणि सीमा लढे आठवले तर संख्या कमी असली तरी संघर्षांची ताकद जास्त होती . परिणामी त्यातून आज शेकडो कन्नड संस्था जन्मल्या आहेत आणि कन्नडसाठी कार्य करत आहेत.
ज्येष्ठ कन्नड सेनानी पद्मराज वैजन्नवर म्हणाले, “बेळगावच्या भूमीतील कन्नड संघर्ष आजही आठवतो . असा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोचवण्याचे काम चंदरगी यांनी केले पाहिजे.
बेळगावच्या राज्योत्सवादरम्यान , कार्यक्रमात सहभागी झालेल्या खासगी संस्थांच्या निवडक चित्ररथांना , गदी कन्नड तेरू राज्योत्सव पुरस्कार प्रदान करण्यात आला.  अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक बसवराज गार्गी यांची भाषणे झाली.


बसूर तिप्पेस्वामी , जयप्रकाश जोशी, मंजू पाटील, श्रीरंग जोशी, मैनुद्दिन मकानदार , , राजू कुसोजी, आनंदा हुलाबत्ते, सूरज हुलबत्ते, प्रवीण कागली, नितीन मुखरे, रजत अंकले, वीरेंद्र गोबारी, जिनेश आदी कार्यक्रमात सहभागी झाले होते. .
बेळगावी जिल्हा कन्नड संघटना कृती समितीचे संस्थापक अशोक चंदरगी म्हणाले यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “कन्नड चळवळ आज चौथी पिढीवर आली आहे. ज्यांनी कन्नड भाषेसाठी काम केले आहे त्यांचा परिचय करून देण्यासाठी तिसरी पिढी आपले अनुभव कथन करेल आणि कन्नड संघर्ष चालू ठेवेल, या अपेक्षेने हा पुरस्कार देण्यात येत आहे..”

.
सुमा पाटील, अनुराधा शेट, रत्ना आजरी, धारिणी महिला मंडळाच्या स्वप्ना कुलकर्णी आणि अंजली जैन यांनी नृपतुंगा युवक संघाचे अध्यक्ष सागर बोरगल यांनी गायलेल्या गीताने प्रारंभ झालेल्या कार्यक्रमाचे स्वागत कृती समिती उपाध्यक्ष शंकर बागेवाडी यांनी केले .

Tags: