Nippani

राज्यस्तरीय युवा संसद स्पर्धेत निप्पाणीचा नागेश मूडलगी प्रथम

Share

राज्यस्तरीय युवा संसद स्पर्धेत निप्पाणीच्या नागेश मूडलगी याने प्रथम क्रमांक पटकावला आहे

पदवीपूर्व शिक्षण विभाग आणि संसदीय कामकाज आणि विधी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय युवा संसद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . प्रत्येक जिल्ह्यातून निवडलेल्या दोन विद्यार्थ्यांची राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती . त्यात चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील केएलइ संस्थेतील जी. आय. बागेवाडी पदवीपूर्व कॉलेजचा विद्यार्थी नागेश मूडलगी याने राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. कर्नाटकचे संसदीय कार्य आणि कायदा मंत्री जे.सी. मधुस्वामी यांनी हा पुरस्कार प्रदान करून विद्यार्थ्याचा सत्कार केला.

Tags:

nagesh-mudalagi-got-1st-prize-in-state-level-youth-parliament-competition/