जागतिक बँकेचे भारताचे कंट्री डायरेक्टर ऑगस्टे तानो कौमे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन महत्वाची चर्चा केली.
जागतिक बँकेचे भारताचे कंट्री डायरेक्टर ऑगस्टे तानो कौमे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज बेंगळूर येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कर्नाटक राज्यात हवामान लवचिकता निर्माण करण्याबाबत चर्चा केली.

बैठकीपूर्वी मुख्यमंत्री बोम्मई यांनी ऑगस्टे तानो कौमे यांचे शाल, चंदनाचा हार, पुष्पगुच्छ आणि म्हैसुरी पगडी देऊन सत्कार केला.
बैठकीत राज्याच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव एन. मंजुनाथ प्रसाद, महसूल विभागाचे प्रधान सचिव (आपत्ती व्यवस्थापन) टी.के. अनिल कुमार, मुख्यमंत्र्यांचे सचिव एम. एस. श्रीकर, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आयुक्त मनोज राजन उपस्थित होते.


Recent Comments