Belagavi

स्टेट रोलर स्केटिंग स्पर्धेत चमकले बेळगावचे स्केटर्स

Share

बेळगाव जिल्हा सार्वजनिक शिक्षण खाते उपसंचालक कार्यालय आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन द्वारा 23 आणि 24 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित स्कूल गेम्स स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022मध्ये बेळगावचे स्केटर्स चांगलेच चमकले आहेत.

सुमारे 200 स्केटर्सनी या आंतरशालेय स्पर्धेत भाग घेतला. त्यात बेळगावमधील स्केटर्सनी 9 सुवर्ण, 5 रौप्य 4 कांस्य अशी एकूण 18 पदके जिंकली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा : स्पीड स्केटिंग : जान्हवी तेंडुलकर 2 सुवर्ण, विशाखा फुलवाले 2 सुवर्ण, यशवर्धन परदेशी 2 सुवर्ण, अमेय याळगी 2 सुवर्ण, 1 रौप्य, श्री रोकडे 1 सुवर्ण व 1 रौप्य, सानिका कंग्राळकर 1 रौप्य, करुणा वाघेला 1 रौप्य व 1 कांस्य, रश्मिता अंबिगा 1 रौप्य, देवेन बामणे 1 कांस्य, शर्वरी दड्डीकर 1 कांस्य, प्रीतम निलज 1 कांस्य.

विजयी स्केटर्स स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विट्टल गगने, सक्षम जाधव, अनुष्का शंकरगौडा, क्लिफ्टन बेरेटो यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगराज कॉलेज कॅम्पस, गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंक येथे सर्व करत आहेत. त्यांना डॉ. प्रभाकर कोरे, शमा घाटगे, राज घाटगे, राज्य स्केटिंग असोसिएशनचे सरचिटणीस इंदुधर सीताराम, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर यांचे प्रोत्साहन लाभले.

Tags: