Politics

वचनानंद स्वामीजी हे “दलाल स्वामी” : आमदार यत्नाळ यांची घणाघाती टीका

Share

हरिहरचे वचनानंद स्वामीजी हे “दलाल स्वामीजी” आहेत. त्यांनी माजी मुख्यमंत्री बीएसवायकडे 10 कोटींची मागणी केली होती. येत्या अधिवेशनात हरिहरच्या या हरीचा खरा रंग उघड करणार आहे अशी घणाघाती टीका करत विजापूरचे भाजप आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी नवा बॉम्ब फोडला आहे.

विजापुरात आज पत्रकारांशी बोलताना भाजप आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी हरिहरच्या वचनानंद स्वामीजींवर जोरदार टीका केली. वचनानंद स्वामीजी हे दलाल स्वामीजी असल्याचा घणाघात केला. हरिहर श्रींनी मंत्री होण्यासाठी 10 कोटी जमा केले. हरिहर श्री यांनी माजी मुख्यमंत्री बीएसवायकडे 10 कोटींची मागणी केली. तसेच, त्यानी मठात व्यभिचार केला आहे. येत्या बेळगाव अधिवेशनात मी त्यावर चर्चा करणार आहे. हरिहरश्रीचा खरा रंग प्रकट करणार आहे असे यत्नाळ यांनी सांगितले.

यावेळी यत्नाळ यांनी माजी जलसंपदा मंत्री आणि केपीसीसी प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील यांच्यावरही टीकास्त्र सोडले. असे 10 एम.बी. पाटील आले तरीही मला हरवू शकत नाहीत. विजापुरात यत्नाळ विरुद्ध एम. बी. पाटील वादावर उत्तर देताना, माझा पराभव झाला पाहिजे, असे म्हणाले. ते काँग्रेस नेते आहेत म्हणून त्यांना बोलावे लागते. मीही त्यांचा पराभव झाला पाहिजे, असे म्हटले आहे. ते काँग्रेसचे आणि मी भाजपचा आहे. पण असे 10 एम. बी. पाटील आले तरी ते शक्य नाही, त्यांच्याच पक्षाच्या दोन आमदारांनी एम. बी. पाटील यांचा पराभव करणार असल्याचे सांगितले आहे. माझा न्याय लोकच करतील, असा टोला आमदार यत्नाळ यांनी लगावला.

कोतवाल रामचंद्रनच्या शिष्यांनी आम्हाला शिकवू नये, असे सांगत यत्नाळ यांनी केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना फटकारले. भाजपमध्ये रौडीशीटर्सना प्रवेश देण्याबाबतच्या शिवकुमार यांच्या विधानाचा समाचार घेताना यत्नाळ यांनी, कोतवाल रामचंद्रनला सिगारेट आणून देणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. ब्लू फिल्म चालवणाऱ्यांत भाजपबद्दल बोलण्याची नैतिकता नाही, असा पलटवार त्यांनी केला.

मंत्री मुरुगेश निरानी यांच्यावरही यत्नाळ यांनी हल्लाबोल केला. कोणता मठ कोण बांधला, का बांधला, पाठीत सुरा कोण खुपसला हे सगळ्यांना माहीत आहे. हा मठ समाजाच्या कल्याणासाठी बांधला गेला नाही तर मंत्रिपदासाठी, मुख्यमंत्री होण्यासाठी बांधला गेला. येत्या काही दिवसांत जनता याला समर्पक उत्तर देईल, असा दावा यत्नाळ यांनी केला.

एकंदर आ. यत्नाळ यांनी वचनानंद स्वामी, एम. बी. पाटील, शिवकुमार आणि निराणी या सगळ्यांचेच चांगलेच वाभाडे काढल्याचे यावेळी दिसून आले.

Tags: