लोककला हा लोकजीवनाचा अविभाज्य भाग असून, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या कलांचे संरक्षण करण्यासाठी शासन अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असून कलाकारांनी यामध्ये सहभागी होऊन कला सादर करावी, असे प्रतिपादन आमदार महादेवप्पा यादवाड यांनी केले.

रामदुर्ग तालुक्यातील गोडची गावातील रामेश्वर नाट्यगृहात बेळगाव कन्नड व संस्कृती विभागातर्फे आयोजित आदिवासी महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करताना त्यांनी तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण कला लोप पावत चालल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

कसाप तालुकाध्यक्ष पांडुरंग जटगन्नावर म्हणाले की, तालुक्यात विविध लोककला मंडळे असून त्यांच्या कला सादरीकरणासाठी योग्य व्यासपीठ नसल्याने कलाकार त्यांची कला जगासमोर येऊ शकत नाही .
कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री यांनी सांगितले की, आपल्या देशातील समृद्ध लोककलांचे रक्षण करून पुढील पिढीला त्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले गोडची ग्रामपंचायतीचे अध्यक्ष इराप्पा गोरव म्हणाले की, प्रत्येक गावात कलाकार आहेत. कलेवर विश्वास ठेवणारे आणि उपजीविका करणारे आहेत. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे ते म्हणाले. गोडची हिरेमठचे मुथय्या हिरेमठ अध्यक्षस्थानी होते. ग्राम पंचायत उपाध्यक्ष रेणाव्वा भजंत्री, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक बी.एस.यादवाड , राज्योत्सव पुरस्कार विजेत्या कलावंत डॉ.लक्ष्मीबाई नीलप्पनवर, उप तहसीलदार आर.एस.घोरपडे, मुख्याध्यापिका एस.व्ही.मशाळे. आदी व्यासपीठावर उपस्थित होते .

जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील 12 हून अधिक कलापथकांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. कलाकार भरत कलाचंद्र यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. व्यंकप्पा निंबाळकर आभार मानले .


Recent Comments