Belagavi

2 ए आरक्षणासाठी 5 डिसेंबर रोजी बैलहोंगल येथे पंचमसाली समाजाचे आंदोलन

Share

केंद्र सरकारच्या ओबीसी आरक्षणात पंचमसाली आणि सर्व पोट जातींचा समावेश २ए करण्यासाठी 5 डिसेंबर रोजी बैलहोंगल येथे आंदोलन करण्यात येणार आहे.अशी माहिती श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजीनी दिली .

शहरात यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना स्वामीजी म्हणाले की, पंचमसाली समाज आर्थिक ,सामाजिक तसेच शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे . त्यामुळे आमच्या समाजातील मुलांचे शिक्षण आणि तरुणांच्या रोजगारासाठी आरक्षण हा एकमेव मार्ग आहे. आम्ही सरकारकडे याआधी मागणी केली आहे . या मागणीच्या पूर्ततेसाठी 5 डिसेंबरला बैलहोंगल येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे .

मागासवर्ग आयोगाचा अहवाल 19 डिसेंबर पर्यंत मुख्यमंत्री बोम्मई यांनी मागवून आरक्षणाची घोषणा करतील . यासाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी 5 डिसेंबरला बैलहोंगल येथे पंचमसाली समाजाकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले
माजी आमदार विश्वनाथ पाटील , ए.बी.पाटील उपस्थित होते

Tags:

balkrishna-maharaj-program-ended/