Vijayapura

सिंदगीत गॅस गोदामाला आग

Share

विजापूर जिल्ह्यातील सिंदगी शहरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने गॅस गोदामात आग लागल्याची घटना घडली.

आगीच्या दुर्घटनेत संपूर्ण इमारत धुराच्या लोटात बुडाली होती. गॅस सिलिंडर साठवण केल्या जाणाऱ्या गोदामात अचानक स्फोट झाल्याने गॅस गोदामाला आग लागली. यावेळी आग सर्वत्र पसरेल या भीतीने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सिंदगी पोलीस ठाण्यामागील गोदामात झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे धुराचे लोट पसरल्याने घाबरलेल्या लोकांनी पळ काढला. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या कारवाईत एकूण दोन अग्निशमन बंबांचा वापर करण्यात आला.

Tags:

gas-cylinder-blast-at-vijayapur-godown/