नेपाळमधील पोखरा येथील रंगसाला इंटरनॅशनल स्टेडियममध्ये १६ ते १९ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या संयुक्त भारतीय खेळ फौंडेशन आयोजित सातव्या आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धेत उचगाव (ता. बेळगाव)चे सुपुत्र आणि चन्नम्मानगरचे रहिवासी ज्येष्ठ धावपटू सुरेश देवरमणी यांनी ३ सुवर्णपदके मिळवली आहेत.
त्यांनी ७० वर्षांवरील गटात १० किमी आणि ५ किमी धावणे तसेच ५ किमी चालणे या क्रीडाप्रकारात प्रथम क्रमांक पटकावून ३ सुवर्णपदके मिळवली. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, पदके व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आजवर त्यांनी विविध देशी आणि परदेशी क्रीडास्पर्धांत हिरीरीने भाग घेऊन दीडशेहून अधिक पदकांची लयलूट केली आहे. या यशामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.


Recent Comments