हनुमान माला संकीर्तन यात्रेला बेळगावमधून बजरंग दल तसेच हनुमान मालाधारी जाणार आहेत . बेळगावच्या मारुतीगल्ली येथील मारुती मंदिरात हनुमान चालीसा पठण करून 700 हून अधिक तरुणांनी कफीलेश्वर मंदिरात हनुमान माला धारण केली .
हनुमान माला संकीर्तन यात्रेसाठी बेळगावमधून बजरंग दल तसेच हनुमान मालाधारी जाणार आहेत . रविवारी संध्याकाळी निघून ते उद्या सोमवारी अंजनाद्री पर्वतावर पोचणार आहेत .
या निमित्ताने आज मारुती गल्लीतील मारुती मंदिरात या यात्रेकरूंनी हनुमान चालिसाचे पठण केले . त्यानंतर कपिलेश्वर मंदिरात जाऊन हनुमान माला धारण केली .
60,000 हून अधिक बजरंग दलाचे कार्यकर्ते, हनुमान दलाचे कार्यकर्ते चालीसा, अंजनाद्री पर्वतावर जाऊन धार्मिक कार्यक्रम करणार आहेत . उत्तर कर्नाटकातील सतरा जिल्ह्यांतून सुमारे तीन महिन्यांपासून हा प्रयत्न सुरू आहे. अंजनाद्री टेकडी वाचवण्याची ही चळवळ सुरु आहे . 60 हजाराहून अधिक मालाधारी एकत्रित हनुमान चालीसा पठण करणार आहेत .


Recent Comments