social

विजापुरात मुस्लिम व्यक्तीने धारण केली हनुमानाची माळ !

Share

हिजाब, हलाल कट, झटका कट यामुळे राज्यातील जातीय सलोखा बिघडला आहे. या घटनांमुळे हिंदू- मुस्लिम समाजात तेढ निर्माण झाली. अशा स्थितीतही एका मुस्लिम व्यक्तीने जातीय सलोखा राखला आहे.

होय, विश्वगुरू बसवण्णांच्या जन्मभूमीत एक मुस्लिम भक्त हनुमानाची माळ धारण करतो आणि हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनाद्री टेकडीवर जातो. या कृतीतून त्यांनी धार्मिक, जातीय ऐक्याचा संदेश दिला आहे.

विश्वगुरु बसवेश्वरांचे जन्मस्थान असलेल्या विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी तालुक्यातील नरसलगी गावातील जाफर बेन्ने हे निस्सीम हनुमान भक्त आहेत. कपाळावर चंदन आणि तिलक लावून, भगवे वस्त्र परिधान करून, गळ्यात हनुमान माला धारण केलेल्या जाफर यांनी जातीपेक्षा भक्ती अधिक महत्वाची असल्याचे दाखवून दिले आहे. हनुमान माला हार घालून जाफर उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध हनुमान जन्मभूमी कोप्पळ जिल्ह्यातील गंगावती तालुक्यातील अंजनाद्री टेकडीवर गेले आहेत.

अंजनाद्री टेकडीवर भगवान हनुमानाची प्रार्थना करून ते आपल्या मालाधारण व्रताची समाप्ती करतील. जाफर बेन्नी यांनी बसवभूमीमधील एकतेसाठी केलेल्या या उपक्रमाचे हिंदू-मुस्लिम बांधवांनी कौतुक केले आहे.

Tags: