Belagavi

मतदारांची नावे वगळल्याबाबत पालिका आयुक्तांना सूचना : आ. अरविंद बेल्लद

Share

माझ्या मतदार संघात अनेक केंद्रावरील मतदार यादीतून मतदारांची नावे हटवण्यात आलीत हे खरे आहे. याबाबत आढावा घेण्याचे पालिका आयुक्तांना कळविल्याची माहिती आ. अरविंद बेल्लद यांनी दिली.

हुबळीमध्ये आज शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना आ. अरविंद बेल्लद म्हणाले की, मी निवडणूक लढवत असलेल्या प्रभाग 33 मधील 586 मते डिलीट झाली आहेत. खुद्द नगरसेवकांनीच याबाबत मला माहिती दिली आहे. त्यामुळे मी आमच्या कार्यकर्त्यांनाही यादी तपासून पाहण्यास सांगितले असून, जी माहिती मिळेल ती महापालिकेला सादर करण्यात येईल.

निवडणूकपूर्व सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर 15-20 खासगी एजन्सी सर्वेक्षणाचे काम करत आहेत. मतदार यादीत नवीन मतदारांची नोंद करण्याचे कामही आम्ही करत आहोत. दलित मतदारांची तपासणी करण्यासाठी पालिका आयुक्तांना कळवण्यात येणार असल्याचे आमदार अरविंद बेल्लद यांनी सांगितले.

एकंदर मतदार यादीतून नावे वगळण्याचे लोण बेंगळूरनंतर आता हुबळी-धारवाडमध्येही पोहोचले आहे. सत्ताधारी आमदारांनीच यावर आवाज उठवल्याने सरकार, निवडणूक अयोग्य या प्रकरणी काय भूमिका घेते हे पहावे लागेल.

Tags:

notice-has-been-given-to-the-commissioner-due-to-the-reason-of-voters-name-deleted-in-the-voters-list/