Kagawad

अथणी कागवाडमध्ये होणार शेतकऱयांच्या पंपसेटसाठी 7 तास वीजपुरवठा

Share

कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी, शेडबाळ, उगार, मंगसुळी येथील शेतकऱ्यांनी शेतकरी नेते सुरेश चौघुले, माजी आमदार राजू कागे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी उगार हेस्कॉम विभाग कार्यालयासमोर निदर्शने केली.

शेतकऱ्यांच्या पंप संचाला दररोज 6 तास वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके हातची जात आहेत.इतर तालुक्यांमध्ये समर्पक
वीजपुरवठा सुरू आहे . इथे निदान 7 तास वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी कागवाड व अथणी तालुक्यात निदर्शने करण्यात आली .
याची दखल घेऊन , ऊर्जामंत्री सुनीलकुमार यांनी , माजी आमदार राजू कागे यांच्याशी चर्चा करून हेस्कॉम विभागाच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारपासून समर्पक वीजपुरवठा सुरू करण्याचा आदेश दिल्याची माहिती शेतकऱ्यांना दिली. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

शेतकरी नेते सुरेश चौगुले म्हणाले की, राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी विधानसभेत ते कागदपत्र दाखवले, ज्यात आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करत आहोत, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. ६ तास वीज पुरवठा मिळत आहे. मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार २४ तास वीजपुरवठा होत आहे . मंत्री जे बोलतात ते सत्य आहे कि अधिकारी जे बोलतात ते सत्य आहे असा सवाल करत त्यांनी वीज पुरवठ्यात बदल न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे .

माजी आमदार राजू कागे यांनी ऊर्जामंत्री सुनिल कुमार यांच्याशी मोबाईलवरून चर्चा केली असता, वीजपुरवठ्यात बरीच तफावत असल्याचे सांगितले . आधीच 6 तास वीजपुरवठा होत आहे . वीज त्यामुळे अनेक सिंचन प्रकल्प अडचणीत आले आहेत. चिक्कोडी आणि रायबाग तालुक्यात ज्याप्रमाणे 7 तास वीज पुरवठा केला जातो त्याचप्रमाणे कागवड अथणी तालुक्यात करावा, असेही ते म्हणाले. मंत्री महोदयांनी ही बाब लक्षात घेऊन हेस्कॉमच्या एमडींना आदेश देणार असल्याचे सांगितले.

अथणी तालुक्याच्या हेस्कॉम विभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी , आपल्या मागण्यांबाबत वरिष्ठांशी चर्चा करून पुढील 15 दिवस केवळ 6 ऐवजी 7 तास वीजपुरवठा करण्याचे आदेश दिले असून, , शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती यकंची यांनी केली आहे .

शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांना अवगत करण्यात आल्याचे उगार हॅस्कॉम विभागाचे अधिकारी डी.ए.माळी यांनी सांगितले.
आंदोलनादरम्यान शेतकरी नेते सुरेश चौगले, अण्णासाहेब आवटी, आदिनाथ , विजय अकिवाटे यांनी राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या निवेदनाच्या प्रती हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

शिवगौडा कागे, भीमू भोळे, भीमू अकिवाटे, राजेंद्र चौगले, प्रकाश हेमागिरे, राजारामा गाडगे, मिलिंद वराळे, अभय पाटील आदी शेतकरी नेते आंदोलनात सहभागी झाले होते.
२४ तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर करताच शेतकरी संघटनेने घोषणाबाजी केली .

Tags:

kagawad-protest-in-front-of-hescom-office/