4 डिसेंबर रोजी ऑल कर्नाटक एक्स-सर्व्हिसमेन्स असोसिएशन जिल्हा युनिट बेळगावचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बसाप्पा तळवार यांनी दिली .
त्यांनी शुक्रवारी शहरातील कन्नड साहित्य भवनात पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली . रविवारी सकाळी 10 वाजता शहरातील कुमार गंधर्व कला मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित होणार आहे. अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बसाप्पा तळवार असतील. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.शिवण्णा एनके हे विशेष निमंत्रित असून, मुजराई विभागाच्या मंत्री शशिकला जोल्ले यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत मानद अध्यक्ष नागप्पा कळसणांवर , उपाध्यक्ष विरुपाक्ष तीळगंजी, दयानंद ढाली, रमेश चौगुला, सरचिटणीस जगदीश पुजेरी, सचिव शिवबसप्पा कडन्नावर आदी उपस्थित होते.


Recent Comments