Belagavi

आ. अरविंद पाटील यांच्या प्रयत्नांमुळे इटगी आरोग्य केंद्रासाठी 12 कोटी 40 लाख मंजूर

Share

खानापूर तालुका इटगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अद्ययावतीकरण करून 30 खाटांच्या समुदाय आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांनी रु. 12 कोटी 40 लाख मंजूर केले आहेत. माजी आमदार अरविंद चंद्रकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. अरविंद पाटील यांनी या संदर्भात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. याबद्दल नागरिकांनी माजी आमदार अरविंद पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Tags: