Athani

अथणीत जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती जथा

Share

जिल्हा पंचायत तालुका आरोग्य विभाग व तालुका सार्वजनिक रुग्णालय, रोटरी क्लब, आयएमए व विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात जनजागृती जथ्याचे आयोजन करण्यात आले होते.

अथणी तहसीलदार सुरेश मुंजे यांनी फीत कापून जनजागृती जथ्याचे उद्घाटन केले. जागृती जथ्याच्या माध्यमातून विविध अधिकारी, संघ-संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालय ते आंबेडकर सर्कल मार्गावर फेरी काढून जनजागृती केली.

यावेळी बोलतांना तालुका वैद्यकीय अधिकारी बसगौडा कागे म्हणाले की, 1 डिसेंबर रोजी एचआयव्ही जनजागृती दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त आजपासून एचआयव्हीचा प्रसार रोखण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. एड्सग्रस्तांची संख्या पूर्वीसारखी राहिलेली नाही ही चांगली बाब आहे. एचआयव्हीबाधितांना शासन आणि संस्थांकडून चांगल्या दर्जाची औषधे व उपचार उपलब्ध करून दिल्यास तेही इतरांप्रमाणे जगू शकतात, असे ते म्हणाले. एचआयव्हीचा प्रसार रोखण्यासाठी घेतलेली खबरदारी आणि लोकांमध्ये जनजागृती यामुळे या रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. तरुण पुरुष आणि महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी आज जनजागृती रॅली काढण्यात आली आहे.

यावेळी तहसीलदार सुरेश मुंजे, समाजकल्याण विभागाचे प्रवीण पाटील, देवराज अरसू निगमचे व्यंकटेश कुलकर्णी, रोटरी संस्थेचे अरुण येलगुद्री, सी. एस. कित्तूर हायस्कूलचे स्काऊट व गाईड्सचे छात्र व लोकापूर महाविद्यालयाचे विद्यार्थी व विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी व सुरेश वालिकार, मुरगेश इंगळी, पी. एम. नरट्टी, रवी हुद्दार, डॉ. महेश मेत्री, सी.एस. पाटील, रमेश हुलकर्डी आणि इतर अनेक वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

Tags: