Vijayapura

भारतीय क्रिकेटपटू राजेश्वरी गायकवाडकडून गोंधळ?

Share

आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू राजेश्वरी गायकवाड स्टेशनरी वस्तू खरेदीसाठी गेली असताना दुकानदाराशी भांडण केल्याची घटना विजापुरात घडली आहे.

विजापूर शहरातील सोलापूर रोडवरील उमदी सुपर मार्केटमध्ये बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. गायकवाड आणि तिचा मित्र दोघेही उमदी सुपर मार्केटमध्ये कॉस्मेटिक वस्तू खरेदी करण्यासाठी गेले असता तेथे गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. कॉस्मेटिक उत्पादनांच्या तपासणीदरम्यान सुपरमार्केटचे कर्मचारी आणि राजेश्वरी यांच्यात वादावादी झाली. मग 8 ते 10 गुंडांना बोलावून त्यांनी सुपरमार्केटचे मालक मल्लिकार्जुन उमदी आणि त्यांचा मुलगा प्रशांत यांच्यावर प्राणघातक हल्ला करविल्याचा आरोप आहे. काही अंतरावर उभे राहून राजेश्वरी गायकवाड व तिच्या मित्राने हा हल्ला घडवून आणल्याची अफवा पसरली आहे.


या गोंधळाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना आदर्शनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags:

uproar-from-indian-cricker-player-rajeshwari-gayakwad/