उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आता 7 फेब्रुवारी रोजी बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेळगावमध्ये प्रशोभक भाषण केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना आज हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, संजय राऊत आज व्यक्तिगत कारणामुळे हजर झाले नाहीत.
व्यक्तिगत कारणामुळे आज उपस्थित राहू शकत नसल्याचे संजय राऊत यांनी आपल्या वकिलांमार्फत बेळगाव न्यायालयाला सांगितले आहे. आज याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान राऊत यांच्या वकिलांनी संजय राऊत यांना हजर राहण्यासाठी पुढील तारीख देण्याची विनंती केली होती. त्यानुसार, न्यायालयाने 7 फेब्रुवारी ही तारीख दिली आहे.
30 मार्च 2018 रोजी बेळगावमध्ये सीमाप्रश्नी संजय राऊत यांनी प्रक्षोभक भाषण केले, असा आरोप त्यांच्यावर आहे. तब्बल 5 वर्षांनंतर संजय राऊत यांना या प्रकरणी कोर्टाने समन्स बजावले आहेत. या समन्सनुसार संजय राऊत यांना आज हजर रहायचे होते. मात्र, कालच राऊतांनी आपण या सुनावणीला हजर राहणार नाही. आपल्यातर्फे वकील जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार राऊतांच्या वकिलांनी आज पुढील तारीख देण्याची विनंती कोर्टाला केली.
Recent Comments