मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच अवघ्या तासाभरात आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यात बुधवारी घडली.
विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील तडवलगा गावात 48 वर्षीय शरणप्पा चन्नमल्लप्पा रूगी यांचे आजारामुळे निधन झाले. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांची 65 वर्षीय आई सुगलाबाई चन्नमल्लप्पा रुगी यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आई आणि मुलाच्या अशा पाठोपाठ मृत्यूमुळे तडवलगा गाव शोकसागरात बुडाले आहे.


Recent Comments