महाविद्यालयीन कार्यक्रमात कन्नड ध्वज फडकावणाऱ्या विद्यार्थ्याला झालेल्या हाणामारीचा व पोलिसांकडून त्या विद्यार्थ्याला करण्यात आलेल्या मारहाणीचा करवेच्या नारायणगौडा गटाच्या सदस्यांनी निषेध व्यक्त करून या महाविद्यालयावर लाल पिवळा ध्वज फडकावण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्याना अटक केली .
महाविद्यालयीन कार्यक्रमात कन्नड ध्वज फडकावल्याकरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारी झाली होती . पोलिसांकडून ह्या कन्नड विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली होती . याचा निषेध व्यक्त करून करवे नारायनगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव -गोवा मार्ग रोखून धरून आंदोलन छेडले . यावेळी त्यांनी रस्त्यात टायर जाळून तीव्र घोषणाबाजी करून विद्यार्थ्याला न्याय मिळवून देण्याची तसेच कन्नड विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी केली . यावेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .
यावेळी सुरेश गवन्नावर तसेच दीपक गुडगनट्टी यांनी एकंदर विषयाची माहिती देऊन , पोलिसांवर कारवाईची मागणी केली .
यानंतर करवे कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा गोगटे कॉमर्स कॉलेजकडे वळवला . कॉलेजच्या प्रवेश द्वारावर या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून , आत घुसण्याचा प्रयत्न केला .इतकेच नाही तर एकाने चक्क पोलीस व्हॅन वर चढून लाल पिवळा हवेत फिरवला . हे कार्यकर्ते पोलिसांनादेखील जुमानत नव्हते . त्यांच्यावर नियंत्रण , मिळवण्यासाठी पोलिसांना फार प्रयत्न करावे लागले . यावेळी गोगटे कॉमर्स कॉलेजच्या कमानीवर चढून एकाने लाल पिवळा फडकावला . प्रकरण हाताबाहेर जात आहे हे लक्षात येताच पोलिसांनी ह्या करवे कार्यकर्त्यांना अटक केली.
विद्यार्थ्यांमधील हे हाणामारीचे प्रकरण आता राजकीय वळण घेऊ पाहत आहे . शहराचीच नाही तर शैक्षणिक क्षेत्राचीही शांतता यामुळे भंग होऊ लागली आहे .


Recent Comments