जि.पं.क्षेत्रामध्ये येणाऱ्या कडोली,अगसगा,केदनुर व हंदिगनुर या चारही ग्राम पंचायत मधील गावातील मतदार यादी दुरुस्त करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली
व्यासपीठावर केपिसिसि सदस्य मलगौडा पाटील,उपताशिलदार एस.के. साळंखे,ग्राम.पं.अध्यक्षा रेखा सुतार,उपाध्यक्षा रेखा नरोटी,तलाठी ए.एम.मुल्ला आदी उपस्थित होते होते.
नंतर केपिसिसि सदस्य मलगौडा पाटील बोलतांना मतदार यादी दुरुस्ती कार्य अत्यंत महत्वाचे असुन पाच वर्षाला एकदा मतदान करण्याचे हक्क प्रत्येक मतदाराला मिळालेच पाहिजे त्यामुळे घरचा पत्ता बदलेले,नोकरी व्यवसाया निमित्त बाहेर असणारे,नविन लग्न झालेले,अठरा वर्षे पूर्ण झालेले नविन नाव नोंदणी व मयत झालेले असे कडोली जिल्हा पंचायत क्षेत्रातील गावांतील प्रत्येक वार्ड,बुथ मधील प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्याची पूर्ण माहिती घेऊन आधार नंबर व आधार लिंक केलेली खात्रि करुन मागील चुका व गोंधळाची पुनारावृती होणार नाही याची नोंद घेऊन बदल करणे,नविन करणे व कमी करुन आता सद्या स्थायिक असलेल्या वार्डातच मतदान असणे अत्यंत महत्वाचे व गरजेचे असुन क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार मिळणेही अत्यंत गरजेचे असल्याने संबंधित अधिकाऱ्यांचे महत्वाचे कार्य आणि जबाबदारी असल्याचे व आमदार सतिश जारकिहोळी यांचेही आदेश असल्याचे त्यांनी सांगितले.

नंतर उप तहसीलदार साळुंखे यांनी सांगितले कि , आठ डिसेंबर ही शेवटची तारीख असुन प्रत्येक बूथ लेव्हल अधिकाऱ्यांना प्रत्येकी मतदार यादी दिलेली असुन प्रत्यक्ष प्रत्येक घराला भेट देऊन प्रत्येक सदस्याचे आधार कार्ड व आधार लिंक झाले आहे कि नाही मार्क करुन सि फार्ममध्ये नोंद करावे व निधन. झाले असेल तर आम्ही मरण उतारा फार्म देणार असुन तेही भरुन देण्याचे सांगून इकडचे तिकडे असा कोणताही गोंधळ न होता मतदार यादी सुधारणाचे कार्य अगदी यशस्वीरीत्या १००% पूर्ण होणे अत्यंत महत्वाचे व गरजेचेही असल्याने तलाठी,बूथ लेव्हल अधिकारी व कर्मचारी यांना चोख काम करण्यासही सांगितले.

तसेच कडोली ग्रा.पं.अध्यक्षा रेखा सुतार,कडोलीचे तलाठी ए.एम.मुल्ला,माजी ग्रा.पं.अध्यक्ष दत्ता सुतार,सदस्या प्रतिभा पाटील, अगसगा सदस्य अमृत मुद्देण्णवर यानीही आपले विचार मांडले
यावेळी कडोली जि.पं.क्षेत्रातील कडोली,अगसगा,केदनुर व हंदिगनुर या चारही ग्राम पं.चे ग्रा.पं.सदस्य, तलाठी, व ग्रामस्थ असंख्येने उपस्थित होते.
माजी ग्रा.पं.अध्यक्ष राजु मायाण्णा यांनी प्रास्ताविक,सुत्रसंचलन,स्वागत व आभार प्रदर्शनही केले.


Recent Comments