Belagavi

फेसबुक फ्रेंड सर्कलच्या मानवतावादी कार्याने जिंकली बेळगावकरांची मने

Share

काही महिन्यांपूर्वी शरीरातील चेतना हरवल्याने गलितगात्र झालेल्या अंबर्डा (ता. जोयडा) येथील शैलेश कृष्ण सुत्रावी या 8 वर्षीय बालक आता बरा झाला असून त्याला बेळगावच्या यश हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. फेसबुक फ्रेंड सर्कल आणि इतरांच्या मानवतावादी कार्यामुळे त्याच्यावर वेळीच उपचार होण्यास मदत झाली आहे.

छोट्या शैलेशला आज, गुरुवारी चेकअप आणि स्कॅनिंगसाठी रुग्णवाहिकेतून यश हॉस्पिटलमध्ये आणले होते. शैलेशला पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी 5 महिने लागतील. त्यांच्यावर सध्या जोयडा येथे घरीच उपचार सुरू आहेत. 21 जून 2022 रोजी त्याला नंदगड येथून आणून यश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. एस. के. पाटील आणि अन्य डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफच्या टीमच्या देखरेखीखाली त्याच्यावर यश हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. डॉ. एस. के. पाटील यांनी आजपर्यंत त्यांचा सर्व वैद्यकीय खर्च आणि औषधे आणि आयसीयू शुल्क अगदी मोफत दिले आहेत. तो नैसर्गिकरित्या ऑक्सिजन सिलेंडरच्या मदतीशिवाय श्वास घेत आहे. पाईप आणि तोंडातून अन्न देखील घेत आहे.

त्याचे डोळ्यांची उघडझाप नियमित होत आहे. त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. तसेच त्यांची आरोग्य तपासणी पिंक हेल्थ चाइल्ड न्युरोलॉजी अँड आर्थरायटिस क्लिनिक – हनुमान नगर, बेळगाव येथे करण्यात आली. बालरोगतज्ज्ञ डॉ. महेश कमते यांनी रुग्ण शैलेशची विनामुल्य तपासणी केली. फेसबुक फ्रेंड सर्कल टीम संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर आणि श्रीराम सेना हिंदुस्थान टीम नरू निलजकर, भरत नागरोळी आदींनी शैलेशला वेळीच उपचार होणेस मदत केली. त्यांच्या कार्यात जिल्हाधिकारी नितेश पाटील, डीसीपी रवींद्र गडादी, बेळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी, खानापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, बेळगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवानंद मास्तीहोळी, स्वामी समर्थ भक्त परिवार बेळगाव, जीवनदीप फौंडेशन, राजू वर्पे, रवी धनुचे, किरण परब, रुग्णवाहिका आणि एअर बेड उपलब्ध करून देणारे स्वामी समर्थ भक्त परिवार, आयओसी कर्मचारी वंदना नलावडे, विद्या कुलकर्णी, शांती वास, आरती सुभेदार, सर्व मीडिया आणि सोशल मीडिया मित्रांचे आणि बेळगावातील सर्व नागरिकांचे तुमच्या प्रार्थना आणि प्रेमाबद्दल मनःपूर्वक आभार मानले आहेत.

एकंदर, फेसबुक फ्रेंड्स क्लब, यश हॉस्पिटल, विविध संस्था, अधिकारी आणि नागरिकांमुळे छोट्या शैलेशला मृत्यूच्या दाढेतून परत ओढून आणण्यात यश आले असून नवे जीवन मिळाले आहे. त्याचे उर्वरित आयुष्यही निरोगी जावे अशीच सगळ्यांची अपेक्षा आहे.

Tags: