Belagavi

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

Share

अंगणवाडी कार्यकर्त्यांना प्राथमिक शिक्षकांचा दर्जा देण्यासहीत अन्य मागण्याच्या पूर्ततेचा आग्रह करून आज सीआयटीयू च्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कार्यकर्त्यांनी निदर्शने करून , जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले .

गुरुवारी , अंगणवाडी कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला . . यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली. आणि आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नितीश पाटील याना सादर केले

यावेळी संघटनेचे जे एम जैनेखान यांनी अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मागणीबद्दल सविस्तर माहिती दिली . अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या ग्रॅज्युइटीसहित ,प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्यासहीत अन्य मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी सरकारकडे केली .

त्याचप्रमाणे अंगणवाडी कार्यकर्त्यांनी त्यांच्या कामाची व्याप्ती आणि सरकारकडून मिळणार अल्प मोबदला याबद्दल माहिती दिली . आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा ६८ हजार अंगणवाडी कार्यकर्त्यांसह बेंगळूरला उग्र आंदोलन करू असा इशारा दिला .

यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या .

Tags: