महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील हे ३ डिसेंबर रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत . यावेळी ते हुतात्मा स्मारक तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयाला भेट देणार आहेत .
या संदर्भातील मंत्र्यांच्या दौऱ्याचा तपशील बेळगाव जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाला आहे . सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा ३ डिसेंबरला त्यांचा कोल्हापूर येथील निवासस्थानापासून सुरु होणार आहे . त्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता बेळगाव मधील छत्रपती शिवाजी उद्यानात ते छत्रपतींच्या मूर्तीचे पूजन करणार आहेत .
त्यानंतर ११.३० वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला जाऊन , हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत .यानंतर ११.५५ च्या दरम्यान , रामलिंगखिंड गल्ली येथील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयाला भेट देणार आहेत .त्याचप्रमाणे तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनाला भेट देणार आहे . त्याचप्रमाणे समिती नेत्यांच्या घरी तसेच हुतात्म्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे . आपली दौऱ्यादरम्यान समिती नेत्यांशी देखील ते चर्चा करणार आहेत .


Recent Comments