Belagavi

तरुण भारत पुरस्कृत घरकुल प्रदर्शनाला बेळगावकरांचा उत्तम प्रतिसाद

Share

बेळगावच्या सीपीएड मैदानावर सुरु असलेल्या तरुण भारत पुरस्कृत घरकुल प्रदर्शनाला बेळगावकरांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे . विविध उपयुक्त आणि गरजेचे स्टॉल्स असल्याने लोकांना एकाच छताखाली प्रत्यक्ष आपल्या घरकुलाकडे नेणारा स्वप्नमय प्रवास अनुभवायला मिळत आहे .

रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव , रोटरी वेणुग्राम चॅरिटेबल फौंडेशन आयोजित , कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन बेळगावच्या सहकार्याने , तसेच गोल्ड प्लस तसेच जल प्रायोजित , 25 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या तरुण भारत पुरस्कृत घरकुल प्रदर्शनाला बेळगावकरांचा उत्तम प्रतिसाद आहे .

बेळगावच्या सीपीएड मैदानावर , दहावे तरुण भारत पुरस्कृत घरकुल प्रदर्शन 2022 सुरु आहे . गृहनिर्माण , बांधकाम साहित्य , फर्निचर , इंटिरियर , आणि एक्स्टीरियर सहित , गृहोपयोगी वस्तू तसेच चटकदार व स्वादिष्ट पदार्थांचे विविध स्टॉल्स इथे लावण्यात आले आहेत .याचबरोबर गृहोपयोगी आणि महिलांचे साहित्य देखील इथल्या स्टॉल्स मध्ये उपलब्ध आहेत . गृहनिर्माण क्षेत्रासाठी लागणारे सर्व साहित्य आणि उपकरणे प्रदर्शनात मांडल्याने , माहिती घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे .

यासंबंधी रोटेरियन विनयकुमार बाळिकायी यांनी सांगितले कि , बेळगावकरांसाठी खास आयोजित केलेल्या या उपयुक्त अशा प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद लाभत आहे . सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या हे दहावे घरकुल प्रदर्शन सुरु आहे . आतापर्यंत 40 हजार लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे असे सांगून त्यांनी या प्रदर्शनाबद्दल माहिती दिली .

त्याचप्रमाणे आर सी पटेल यांनी देखील या प्रदर्शनाची माहिती दिली.

हे प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांची मोफत आरोग्य तपासणी करण्याची व्यस्थादेखील आयोजकांनी केली होती . त्याचप्रमाणे दररोज लकी ड्रॉ कूपनद्वारे आकर्षक बक्षिसे , त्याचप्रमाणे मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात येत आहे . एकंदर घरकुल प्रदर्शन हे सर्वार्थाने बेळगावकरांना त्यांच्या घरकुलाकडे नेणारा स्वप्नमय प्रवास आहे .

Tags: