सर्वलोक सेवा फौंडेशनच्या सदस्यांनी बेळगावच्या जयनगर येथील श्री मल्लिकार्जुन आणि करेम्मा देवी मंदिराच्या परिसरात देव-देवतांचे जुने फोटो जमा केले.
श्री मल्लिकार्जुन आणि करेम्मा देवी मंदिराच्या आवारात ठेवण्यात आलेल्या देवतांच्या जुन्या फोटोंचे मंगळवारी सर्वलोक सेवा फाऊंडेशनच्या नेतृत्वाखाली विधीवत विसर्जनासाठी संकलन करण्यात आले. या दरम्यान, बिल्वपत्री व बन्नीची झाडे लावण्यात आली.

मंदिर समितीनेही या कामाला पाठिंबा दिला. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष प्रेमानंद केरुर, दुंडाप्पा संकेश्वर, एम. एस. कृष्णमूर्ती, ईश्वरा थिम्मापूर, सुरेश होसमणी, मार्तंड कुलकर्णी, रवींद्र पट्टणशेट्टी, बी. एम. होसपेटे, देवप्पा कांबळे आदींचा सहभाग होता.


Recent Comments