कर्नाटक बसेसवर काळी शाई आणि दगडफेक केल्याबद्दल, महाराष्ट्रातील मराठी कार्यकर्त्यांच्या विरोधात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या स्वाभिमानी गटातर्फे बेळगावात निदर्शन करण्यात आले .
बेळगावातील चन्नम्मा सर्कल येथे मंगळवारी निदर्शने करत कर्नाटक रक्षण वेदिका स्वाभिमानी गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोध संताप व्यक्त केला. तसेच बेळगावचे आमदार बेपत्ता असल्याचे फलक हातात घेऊन त्यांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हाध्यक्ष ईश्वर गौडा पाटील म्हणाले कि , महाराष्ट्रातून कन्नडिगांना वारंवार चिथावणी दिली जात आहे. आपण असहाय आहोत अशीही ओळख झाली आहे. पण आमच्या बसेसवर काळी शाई फेकणे , आणि दगडफेक करणे हे पुरुषार्थाचे लक्षण नाही . आम्ही आमच्या बेळगावचा एक इंचही भाग महाराष्ट्रात सोडणार नाही. तसेच कर्नाटक सरकारने एमईएस आणि शिवसेना संघटनांवर राज्यात बंदी घालावी. बेळगावचा एकही आमदार याबाबत आवाज उठवत नाही. त्यांनी याबाबत मौन बाळगल्यास येत्या निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
कर्नाटक रक्षण वेदिका स्वाभिमानी गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.


Recent Comments