वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश के बी एस रोटेरा म्हणाले की, आपल्या देशाचे संविधान सर्व घटकांना लोकशाही आणि न्याय्य जीवन निर्माण करण्यास मदत करते.

आज हुक्केरी न्यायालय परिसरात संविधान दिन व कायदा साक्षरता दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन, त्यांनी रोपाला पाणी देऊन केले व वकिलांना संबोधित करताना, डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील संघाने सर्व जाती, धर्म, लिंग, भाषिक असा भेदभाव न करता , देशाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी जगातील बहुतांश घटनांचा अभ्यास केला आणि भारताला सर्वोत्तम संविधान दिले असे ते म्हणाले.

व्यासपीठावर वकील संघाचे अध्यक्ष राजीव चौगला, उपाध्यक्ष एन.आय.देमण्णावर, सचिव एम.के.पाटील, भीमसेन बागी उपस्थित होते. नंतर ज्येष्ठ वकिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ऍड . बी. एम. जिनराळे , एस. जी. नदाफ, आशा सिंगाडी, ए.एम. हटगोल , रामचंद्र जोशी, प्रकाश मुतालिक , आर.बी.चौगला, के. पी. शिरगावकर आदी उपस्थित होते.


Recent Comments