Nippani

आंतरराज्य पोलीस अधिकारी बैठकीला निपाणीत सुरुवात

Share

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दोन्ही राज्यातील पोलीस दलात माहितीच्या देवाणघेवाणीसह समन्वय आवश्यक असल्याचे मत कर्नाटकाचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार यांनी व्यक्त केले आहे.

निपाणी येथील सरकारी विश्रामधाम आज मंगळवारी सकाळी महाराष्ट्र व कर्नाटक आंतरराज्य पोलीस अधिकारी बैठकीला प्रारंभ झाला आहे. त्यात भाग घेऊन संबोधित करताना एडीजीपी अलोककुमार यांनी दोन्ही राज्यातील सीमाभागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आंतरराज्य गुन्हेगारांवर वचक ठेवण्याची गरज व्यक्त केली. यासाठी दोन्ही राज्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांच्यामध्ये ताळमेळ, समन्वय असणे आवश्यक आहे. आपापल्या हद्दीतील कुप्रसिद्ध गुन्हेगार, रौडी शीटर्स आणि उपद्रवी गुन्हेगारांच्या विषयी माहितीचे आदान-प्रदान करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या उच्चस्तरीय आंतरराज्य पोलीस अधिकारी बैठकीला बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी सतीशकुमार, बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी यांच्यासह दोन्ही राज्यांचे मिळून ३ डीआयजी, ८ एसपी, एसीपी, डीवायएसपी, निरीक्षक आदी अधिकारी उपस्थित आहेत

Tags: