Belagavi

विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीराचे संघ रवाना.

Share

अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचे प्राथमिक व माध्यमिक मुला मुलींचे फुटबॉल संघ विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत.

केदारपुर ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथील सरस्वती शिशु मंदिर शाळेच्या मैदानावर 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या 33 व्या राष्ट्रीय विद्याभारती फुटबॉल स्पर्धेसाठी दक्षिणमध्य क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणार्या संत मीरा शाळेचे प्राथमिक व माध्यमिक मुला मुलींचे संघ पात्र ठरले आहेत तसेच 19 वर्षाखालील पदवीपूर्व कॉलेजच्या स्पर्धेसाठी खानापूर येथील शांतिनिकेतन पदवीपूर्व कॉलेजचा संघ पात्र ठरला आहे.

प्राथमिक मुलांच्या संघात प्रतीक पालेकर, वेदांत पाखरे, रक्षित गोरगौंडा, अथर्व गावडे, समर्थ पनारी ,अब्दुल्ला मुल्ला, ओम खमखरट्टी, साहिल हलगेकर, साईश कुंभार, सर्वेश देमजी, मोहम्मद रेहान अख्तर, गौरव देसाई, साईराज कुराळे, श्लोक भडांगे, चेतन दिग्गी, रत्नाकर गौतम, प्राथमिक मुलींच्या संघात राशी असलकर, अंजली चौगुले, केजोंती ब्रु, तलिरुंग रिंग, दीपिका रिंग, सान्वी पाटील, रितिका लोहार, चरण्या मंजुनाथ, चैत्रा इम्मोजी, आकांक्षा बोकमुरकर,नताशा चंदगडकर, श्रद्धा कोल्हापूरे, अवमृता मोळशोय, संजिता रिंग, मोनिता रिंग, सृष्टी बोंगाळे दीपा बिडी, ऐश्वर्या शहापूर, माध्यमिक मुलांच्या गटात रेहान नदाफ, प्रणव खोराटे, आदित्य सानी, विशाल जाधव, स्वयंम ताशिलदार, मंथन बंडाचे, मृणाल शिंदे, देवेश मटकर, साई आपटेकर, वैभव मरगाळे, मंथन हलगेकर, आरिहंत पाटील, मुजकीर होसमनी, नागेश सावळगी, प्रणव देसाई, स्वयंम काकतकर, स्वरूप हलगेकर, गणेश पाटील, तर माध्यमिक मुलींच्या संघात संस्कृती भंडारी, संस्कृती खन्नुरकर, प्रेनारूनग मोलशिय, रेनिवर मोलशोय, सलामी अपेतो, चादोरुंग माश, ओरीणा वॉरन, खोब्रस दलशकीमकिया, प्रीती भांदुर्गे, सृष्टी सावंत, भूमिका कुलकर्णी, स्वरा आंजनकर, झिया बाचीकर, कीर्ती मुरगोड, श्रद्धा ढवळे, प्रियांका पाटील, समीक्षा चौगुले, सृष्टी सचिन सावंत यांचा संघात समावेश असून हे सर्व खेळाडू क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, नीरज सावंत, गौतम तेजम, चंद्रकांत तुर्केवाडी, ओमकार सावगांवकर ,शिक्षिका धनश्री पाटील, विणाश्री तुक्कार यांच्या समवेत रवाना झाले आहे.

या संघाला हनुमान स्पोर्ट्सचे संचालक आनंद सोमण्णाचे, साईराज स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष महेश फगरे, विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, अस्मिता इंटरप्राईजेसचे संचालक राजेश लोहार यांनी संघाला क्रीडासाहित्य व गणवेष देऊन शुभेच्छा दिल्या तसेच विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, जिल्हाध्यक्ष राघवेंद्र कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, व पालक वर्गाने संघाला रवानापूर्वी शुभेच्छा दिल्या.

Tags: