Belagavi

बेळगावच्या ‘तरुणतुर्क’ खेळाडूंचे राष्ट्रीय स्पर्धेत यश

Share

महाराष्ट्रातील नाशिक येथे झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या ‘खेल महाकुंभ’ या क्रीडास्पर्धेत बेळगावच्या वयस्कर क्रीडापटूंनी तब्बल 6 सुवर्ण आणि 6 रौप्य पदके जिंकून बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे.

होय, नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुल स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये 25 ते 27 नोव्हेंबर या काळात झालेल्या वयस्करांच्या दुसऱ्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत बेळगावच्या वयस्कर क्रीडापटूंनी तब्बल 6 सुवर्ण आणि 6 रौप्य पदके जिंकून कमाल केली आहे. यात 85 वर्षावरील वयोगटात वसंत जाधव यांनी गोळाफेक आणि हातोडा फेकमध्ये प्रथम तर भालाफेक आणि थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.

75 वर्षावरील वयोगटात मारुती कणबरकर यांनी 3 किमी चालण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. 75 वर्षावरील वयोगटात धोंडीराम शिंदे यांनी 10 किमी धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक तर 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. 70 वर्षावरील वयोगटात सुरेश देवरमणी यांनी 10 किमी धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय, 5 किमी धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक तर 5 किमी चालण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.
65 वर्षावरील वयोगटात बाळकृष्ण बेळगुंदकर यांनी भालाफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे. या ‘तरुणतुर्क’ खेळाडूंच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags:

bgm-sr-citizen-sportsmen-excell