बेळगावच्या ग्रामीण भागात राजकारण जोरदार सुरु आहे. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी मैदानात उतरून विरोधकांना हादरा दिला आहे.
होय, नुकतीच हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांना घेऊन रमेश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेतली होती . आता त्यांनी पुन्हा नागेश मन्नोळकर यांच्यासह माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली आहे . हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. काल सांबरा ग्रा.पं. मध्ये भाजपच्या विविध नेत्यांची बैठक घेऊन , रमेश जारकीहोळी यांनी पुढील निवडणुकीत भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले आहे. त्या संदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांना तातडीने कामाला लागण्यास सांगितले आहे.
एकंदरीत रमेश जारकीहोळी ग्रामीण भागातील कडव्या प्रतिस्पर्धी लक्ष्मी हेब्बाळकर यांचा पराभव करण्यासाठी डावपेच आखत आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर याचा कसा प्रतिकार करतील हे पाहावे लागेल.


Recent Comments