Davanagere

दावणगिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची हुक्केरी हिरेमठाला भेट

Share

दावणगिरीचे जिल्हाधिकारी शिवानंद कापसे यांनी हुक्केरी शहरातील श्री गुरु शांतेश्वर हिरेमठ संस्थानाला भेट देऊन हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींचे आशीर्वाद घेतले.

त्यानंतर ते म्हणाले की आज आपण दावणगिरी येथे जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावत आहोत. आधीपासूनच आपण हुक्केरी हिरेमठ स्वामींच्या आशीर्वादाने काम करीत आहोत . हुक्केरी हिरेमठ हे सर्व स्तरावर संस्कार देत आहेत आणि संपूर्ण राज्य कर्नाटक राज्य अक्षर दासोह ,एन जी ओ , फेडरेशनचे अध्यक्ष या नात्याने अक्षर दासोह योजना राबवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनाही मार्गदर्शन करत असल्याचा मला आनंद झाला आहे. .

श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा आयुक्त शिवानंद कापसे यांना आशीर्वाद दिले, आम्ही त्यांना अनेक वर्षांपासून पाहत आहोत, त्यांना दावणगेरे जिल्ह्यात आणखी चांगल्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. मुन्नोळी आदींसह अनेकजण उपस्थित होते

Tags:

DAVANGIRI DC HIREMATH hukkeri