आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, विजापूर जिल्हा भाजप शाखेकडून ‘मन की बात’ थेट पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
विजापूर शहरातील गँगबावडी येथील भाजप कार्यालयात विजापूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ, माजी मंत्री अप्पू पट्टणशेट्टी, एस. के. बेलुब्बी आदी भाजप नेते यावेळी उपस्थित होते. विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी मोदींनी या कार्यक्रमात संवाद साधला. देशातील 10 ठिकाणांहून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. विजापूर जिल्हा देशातील या दहा ठिकाणांपैकी एक होता.


Recent Comments