समाजातील अन्याय्य प्रथा, देवदासी प्रथा नष्ट करणे, पिडीत बालक व महिलांच्या कल्याणासाठी मुक्तिसंस्थेचे कार्य आणि हजारो बालकांना व महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविण्याचे बी.एल.पाटील यांचे कार्य महान आहे. त्यांचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती मोटगी मठाचे श्री प्रभू चन्नबसव स्वामीजी यांनी सांगितले .

अथणी शहरातील मोटगी मठातील कल्याण सभागृहात अथणी नागरिक संघ व उत्सव समिती सदस्यांच्या प्राथमिक बैठकीत पार पडली . चार दशके लोकांसाठी जीवनदायी ठरलेले बी.एल.पाटील यांचा अमृत महोत्सव सोमवार 28 रोजी सकाळी 10 वाजता संतराम पदवीधर विद्यापीठात साजरा होणार आहे. शिवाय उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडून कार्यक्रम यशस्वी करण्याचा सल्ला दिला.
निडसोशीचे जगद्गुरू पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी आणि इलाकल्लाचे गुरु महंता महास्वामी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. गुजरातमधील उमरठा संतराम मंदिराचे संत श्री गणेश दासजी महाराज उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. आमदार महेश कुमठळ्ळी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात सीमा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सी सोमशेखर उपस्थित राहणार आहेत . एस महादेवय्या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. प्रसिद्ध अभ्यासक डॉ. व्ही. एस.माळी यांचे अभिनंदनपर भाषण, वीरेश वाली यांचा संगीतमय कार्यक्रम यावेळी सादर केला जाणार आहे .
यावेळी रमेश गौडा पाटील, डॉ. प्रकाश कुमठळ्ळी, प्रकाश पाटील, मुत्तन्ना संती, अविनाश नाईक, अलगौडा पाटील, विजयकुमार नेमगौडा, मुरगेश बने, रवी संक , मल्लिकार्जुन अंदानी, प्रमोद बिल्लुर, प्रकाश चन्ननवर, महांतेश इंगळी, सिद्धू हंडगी आदी उपस्थित होते.


Recent Comments