सीमावाद संपला असला तरी महाराष्ट्र सरकार येथील राजकीय परिस्थितीवरून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी सीमाप्रश्नाचा मुद्दा उकरून काढण्याचा प्रयत्न करत आहे, अशी सडकून टीका आमदार एम. बी. पाटील यांनी महाराष्ट्र सरकारवर केली.
विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील इटंगिहाळ गावात आज, रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना एम. बी. पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील विद्यमान सरकार सीमेचा वाद उकरून काढून तेथील राजकीय परिस्थितीवरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी जर हा वाद उकरून काढल्यास सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, जतसह मोठा प्रदेश आम्हाला मिळेल. आता जत भागातील लोक कर्नाटकात सामील होण्यासाठी पुढे आले आहेत. महाराष्ट्रातील सरकारने आपल्या भागाचा विकास केला नसल्याची त्यांची तक्रार आहेअसे ते म्हणाले.


Recent Comments