Belagavi

बेळगावात पहिल्या कॅट शोला उत्स्फूर्त प्रतिसाद !

Share

कुणी घाऱ्या डोळ्यांचे तर कुणी लांबसडक केसांचे, कुणी बारीक बांध्याचे तर कुणी गुबगुबीत अशा विविध जाती-प्रजातीच्या मांजरांचे शानदार प्रदर्शन आज बेळगावात पार पडले. शहरात प्रथमच आयोजित केलेल्या या कॅट शोने कुंदानगरीतील लोकांचे लक्ष वेधून घेतले. अनेक वैशिष्ट्यपूर्ण मांजरांच्या विविधतेने मांजरप्रेमी मंत्रमुग्ध झाले.

सुंदर, विभिन्न प्रकारची मांजरे, त्या गोंडस मांजरांकडे टक लावून पाहणारे लोक. होय, तुम्ही पाहत असलेले हे दृश्य बेळगावातील भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयात आयोजित कॅट शोमधील आहे.

होय, फेलाइन क्लब ऑफ इंडिया, मार्स पेट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज, रविवारी चॅम्पियनशिप कॅट शोचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 200 हून अधिक मांजरांनी सहभाग घेतला होता. पर्शियन, मेन कून, बंगाल, इंडियन आणि अन जातींच्या मांजरांना पाहून लोकांनी आनंद घेतला. त्याचप्रमाणे या मांजरांचे मालक त्यांचे पालनपोषण कसे करतात? त्यांना मांजरांची किती काळजी आहे हे त्यांना अनुभवता आले. बेळगावात पहिल्यांदाच कॅट शोचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. कोल्हापूर, मुंबई, पुणे, बेंगळुरू, शिमोगा, हुबळी आदी भागातील 10 प्रकारच्या मांजरांचा यात समावेश आहे. आम्ही सर्व प्रकारची व्यवस्था केली आहे. मोठ्या संख्येने लोक आले आहेत. या कॅट शोला लोकांचा प्रतिसाद अप्रतिम असल्याचे ते म्हणाले.

यावेळी बंगळूरहून खास या कॅट शोसाठी आपली मांजर घेऊन आलेला शाहरुख या युवकाने सांगितले की, आपले मांजर पर्शियन जातीचे असून ते खूप फ्रेंडली आहे. त्याचे ग्रूमिंग करणे आवश्यक आहे. आम्ही दररोज त्याची काळजी घेतो. 24 तास ड्राय फूड, वेट फूड दिवसातून किमान एकदा देतो. आठवड्यातून एकदा आंघोळ घालावी लागते. हा कॅट शो पाहण्यासाठी बरेच लोक आले आहेत. विशेषत: शाळकरी मुलांनी याचा खूप आनंद घेतलाय असे त्याने सांगितले.

एकंदर, बेळगावात डॉग शो अनेकवेळा होत असले तरी प्रथमच आयोजित केलेल्या या कॅट शोला मार्जारप्रेमी बेळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

Tags:

mega-cat-show-in-belagavi-