कागवाड तालुक्यातील ऐनापूर शहरात एक कोटी रुपये खर्चून बांधलेल्या श्रीहरी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कळसारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथील गुरुवर्य बाळासाहेब देवुकर महाराज व बसवेश्वर महाराज यांच्या उपस्थितीत रविवारी पहाटे महापूजा करून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

ऐनापूर प्राथमिक कृषी संस्थेच्या प्रांगणातून हत्ती, घोडे, वाद्यांसह आज, रविवारी शहराच्या प्रमुख मार्गाने मंदिराच्या कळसाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. परमपूज्य बसवेश्वर महाराज व गुरुवर्य बाळासाहेब देवूकर महाराज यांच्या दिव्य उपस्थितीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत मिरवणूक निघाली.

मिरवणुकीत कळसासाठी देणगी दिलेले देणगीदार राकेश कारची, भक्त अण्णासाहेब कटावे, अनिल निकम, विश्वनाथ कटावे, विठ्ठल कटावे, नितीन काकडे, सुभाष लोंढे, दादागौडा पाटील, राजेंद्र पोतदार, मोहन कारची, सुभाष पाटील, भरतेश लोंढे, नागरत्न हेगडे आदी गावातील ज्येष्ठ नागरिक व अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
विठ्ठल मंदिराचे भक्त अण्णासाहेब कटावे यांनी सांगितले की, ऐनापूर शहरातील सर्व मराठा समाजातील ज्येष्ठांनी गेल्या 30 वर्षांपासून अथक परिश्रम करून एक कोटी रुपये खर्चून मंदिर उभारले आहे. त्याच्या कळसाची आज भव्य मिरवणूक काढण्यात येत आहे. सिद्धेश्वर स्वामीजींच्या दिव्य उपस्थितीत उद्या, सोमवारी भव्य कळसारोहण कार्यक्रम होणार आहे. त्यात कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील, श्रीनिवास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भाविकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. बाइट


Recent Comments