Belagavi

प्रथम श्रेणी शासकीय महिला महाविद्यालयात संविधान दिन साजरा

Share

राज्य महिला आयोग, शासकीय प्रथम श्रेणी महिला महाविद्यालय आणि अधिवक्ता परिषद कर्नाटक उत्तर बेळगाव युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम श्रेणी शासकीय महिला महाविद्यालयात संविधान दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

शनिवारी , शहरातील काकतीवेस येथील , प्रथम श्रेणी महिला महाविद्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुणे व सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ;
कॉलेजचे प्राचार्य तरगर यांनी संविधान दिनाचे आयोजन करण्याच्या मुख्य उद्दिष्टांवर चर्चा केली.

प्रमुख पाहुण्या ऍड . भारती वाळवेकर यांनी आपल्या भारतीय राज्यघटनेचे महत्त्व, महिला व बालकांचे रक्षण करण्यासाठी विविध कायदे आणि त्यांची उद्दिष्टे आणि मानवी हक्क या विषयावर भाषण केले.

जिल्हा सरकारी वकील तसेच बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड . सचिन आर. शिवण्णावर यांनी संविधानाच्या प्रस्तावनेवर भाषण केले. अधिवक्ता परिषद कर्नाटक उत्तर बेळगाव युनिटचे जिल्हाध्यक्ष ऍड . सदाशिव हिरेमठ यांनी परिषदेच्या मुख्य उद्दिष्टाविषयी माहिती दिली. तर ऍड . सीएस कलमठ यांनी प्रस्तावनेवर शपथ दिली.

बास्केटबॉलचे भारतीय प्रशिक्षक प्राध्यापक व्ही एस . पाटील , प्रा. डॉ. जयश्री, ज्योती, अॅड गीता, सुमित, दीपक आणि इतर प्राध्यापक कर्मचारी आणि शासकीय महाविद्यालयातील 200 हून अधिक विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते .

Tags:

constitution-day-celebration-at-government-wonems-college