पुन्हा उदभवलेल्या सीमावादातून बसवर दगडफेकीची घटना घडल्यामुळे कर्नाटक-महाराष्ट्र बससेवेत कपात करण्यात आली आहे. परंतु कागवाड सीमेपर्यंत महाराष्ट्राची बससेवा सुरु झाली आहे.

कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कागवाडजवळील मिरज शहरातील अथणी डेपोच्या बसवर काल शुक्रवारी रात्री दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही राज्यांतील बससेवा बंद करण्यात आली आहे.
दोन राज्यांच्या सीमेवर असलेल्या कागवाड येथे दोन्ही राज्यांच्या बसेस प्रवासी घेऊन येत सीमेवरच प्रवाशांना सोडत आहेत. संबंधित राज्यांचे प्रवासी नंतर त्या-त्या राज्यांच्या बसेसमधून किंवा खासगी वाहनांचा पुढील प्रवासासाठी आसरा घेत आहेत. मात्र, अचानक राज्याच्या सीमेवर प्रवाशांना उतरवून वेगवेगळ्या बसेसमधून किंवा खासगी वाहनांतून पाठविण्यात येत असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे मुख्याधिकारी नारायण देशमुख यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री बसवर दगडफेक झाल्याने प्रवाशांना त्रास झाला. मात्र आता अशी कोणतीही घटना घडली नसून सर्व प्रवासी सुरळीतपणे प्रवास करत आहेत. बसने प्रवास करण्यास प्रवासी नाखूष आहेत. मात्र सध्या कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी थेट सांगितले.
दरम्यान, अथणी सीपीआय रवींद्र नायकोडी, कागवाडचे पीएसआय हनुमंत नरळे पोलीस कर्मचाऱ्यांसोबत दोन्ही राज्यांच्या सीमेवर पाळत ठेवून आहेत.


Recent Comments