Belagavi

3 डिसेंबर, 4 रोजी दुबई येथे आंतरराष्ट्रीय जैन परिषद: पुट्टस्वामी यांची माहिती

Share

जैन समाजातील धार्मिक व सामाजिक कार्यात आघाडीवर असणारे सुहस्ती युवा जैन मिलन बंगलोर आणि जैन मिलन दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे ३ व ४ डिसेंबर रोजी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सुहस्ती युवा जैन मिलनचे अध्यक्ष पुट्टस्वामी के. डी .यांनी दिली .

बेळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना पुट्टस्वामी के.डी म्हणाले की, सुहस्ती जैन मिलन संस्थेतर्फे गेल्या सात वर्षांपासून कर्नाटकातील विविध भागात जैन संमेलने आयोजित केली जात असून, या संमेलनाच्या माध्यमातून समाजात धार्मिक व सामाजिक विचार मांडले जातात. जेएसएस प्रायव्हेट स्कूल , अल सफा दुबई येथे पहिल्यांदाच परदेशात जैन परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या जैन परिषदेत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, जर्मनी आणि दुबईसह इतर देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या परिषदेत धार्मिक चर्चा व सामाजिक विकासावर चिंतन चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्घाटन समारंभ 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता होणार असून याप्रसंगी माला हर्षेंद्र जैन यांचे भाषण होणार आहे.प्रसिद्ध अभ्यासक, जैन साहित्यिक व संशोधक नाडोजा डॉ. हंपा नागराजय्या या संमेलनाचे उद्घाटन करतील. भारतीय जैन महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा अनिता सुरेंद्रकुमार, एन.प्रसन्न कुमार, माजी मंत्री अभयचंद्र जैन, उद्योगपती निरंजन जैन जळवल्ली , जैन महासंघ झोन-८ चे अध्यक्षा पुष्पराज जैन, वरिष्ठ पोलीस अधिकारी जिनेंद्र खणगावी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संदेश जैन पुट्टस्वामी के.डी , दुबईतील जैन समाजाचे नेते पी. देवकुमार कांबळी, सामाजिक कार्यकर्त्या माला जैन, विमल तालिकोटी, श्वेता जैन हे प्रमुख पाहुणे असतील. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक स्वामीजी अध्यक्षस्थानी राहून आशीर्वचन देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

त्या दिवशी पद्मप्रसाद जैन लिखित जैन साहित्य इतिहास आणि जयलक्ष्मी अभयकुमार लिखित पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. यासोबतच नेरेंकी पार्श्वनाथचे संकेतस्थळही सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिनेंद्र चित्ते यांनी सांगितले कि . 4 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जैन धर्म प्रश्नमंजुषा, खेळ , जैन धर्मासाठी सत्य या विषयावर सल्लामसलत आणि संमेलन पुरस्कार वितरण कार्यक्रमांसह डॉ. स्नेयश्री निर्मल कुमार यांचा संगीताचा कार्यक्रम, जैन मिलन दुबईचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामूहिक गायनाचा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत भरतेश शिक्षण संस्थेचे संचालक विनोद दोड्डन्नवर, वज्रकुमार, विमल तालिकोटी, अभियान समिती सदस्य कुंतीनाथ कलमणी , अभय अवलक्की, पद्मराज वैजन्नवर, पवनकुमार उप्पिन आदी सहभागी झाले होते.

Tags:

december-4-5-international-jiva-sammelan-at-dubai/