कडोली येथील सरकारी वाचनालयामध्ये तालुका पंचायत अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संविधान दिन साजरा करण्यात आला .
शनिवारी ग्राम पंचायत सदस्य संजय कांबळे यांच्या प्रमुख उपस्थित जेष्ठ नागरिक गजानन तेर्णिकर यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करून व नारळ वाढवून संविधान दिन कार्यक्रमाचा शुभारंभ केला
यावेळी सरकारी कन्नड हायस्कूलची विद्यार्थीनी अमृता पाटील हिने आपल्या देशाच्या संविधानाबद्दल विचार व्यक्त करणारे भाषण करुन वरील सर्वांच्या उपस्थितीत शपथ ग्रहणही करवुन घेतले.
यावेळी ग्रा.पं.सदस्य संजय कांबळे,जेष्ठ नागरिक गजानन तेर्णिकर,यल्लाप्पा करेगार, ग्रंथपाल जयश्री पाटील,सरकारी कन्नड हायस्कूलचे शिक्षक नदाफ सर, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments