हिंदूंवर होणार्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणी येथे 27 नोव्हेंबरला हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे .

या संदर्भात निपाणी येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली . भारताच्या संविधानात प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता आणि न्याय मिळेल, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय-आयोग नाही. देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण, तर मशिदी-चर्चचे सरकारीकरण का नाही ? अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूंनी काय अपराध केला आहे ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच ‘सेक्युलर’ व्यवस्था अस्तित्वात आहे का ? हिंदूंच्या हजारो युवतींना उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजे ‘लव्ह जिहाद’. भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट ‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणार्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणी येथे 27 नोव्हेंबर या दिवशी म्युनिसिपल हायस्कूल मैदान, जुना बी.पी. रोड येथे सायंकाळी 5.30 वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी निपाणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष . जयवंत भाटले, नगसेवक . संतोष सांगावकर, माजी नगरसेवक विजय टवळे, हिंदुत्वनिष्ठ अभिनंदन भोसले, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, इस्कॉनचे अनिल खांडके, अद्वैत पंथभक्त मंडळाचे अध्यक्ष . अण्णासाहेब कुलकर्णी, यर्नाळ येथील कीर्तनकार ह.भ.प. नवनाथ घाटगे उपस्थित होते.


Recent Comments