Belagavi

एकजुटीने रिंगरोडला विरोध करणे अत्यावश्यक : सोमवारचा चाबूक मोर्चा व्हावा शिस्तबद्ध

Share

रिंगरोडला विरोध करण्यासाठी सोमवारी चाबूक मोर्चा काढण्यात येणार आहे . एकजुटीने रिंगरोडला विरोध करणे अत्यावश्यक आहे . त्यामुळे शिस्तबद्धरित्या मोर्चा काढून , आपली ताकद दाखवा असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांना करण्यात आले .

माजी आ . मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखालीमी गुरुवारी , ओरिएंटल स्कुलच्या संत तुकाराम महाराज सभागृहमध्ये सोमवारी होणाऱ्या चाबूक मोर्चा संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली . या चाबूक मोर्चात , तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी आपला सहभाग दर्शवणे गरजेचे आहे . शेतकऱ्यांनी येताना टेम्पो , ट्रॅक्टरवर , आपल्या गावाचा बॅनर लावावा , शेतकऱ्यांनी हातात चाबूक घेऊन यावे तसेच केवळ शेती वाचवण्यासाठी घोषणा देण्यात याव्यात ,कोणताही ध्वज वाहनांवर लावू नये , किंवा कोणीही ध्वज आणू नये असे आवाहन करून याबाबत बैठकीत ठराव करण्यात आला .

यावेळी मार्गदर्शन करताना माजी आ . मनोहर किणेकर म्हणाले कि , सरकार शेतकऱ्याची सुपीक जमीन या ना त्या कारणाने हडप करीत आहे . आता रिंगरोड साठी पिकाऊ जमीन संपादित करू पाहत आहे . त्यामुळे एकजुटीने रिंगरोडला विरुद्ध करणे आवश्यक आहे . हा मोर्चाचे शिस्तबध्दरितीने काढून सरकाराला आपली ताकद दाखवून दिली पाहिजे .

यावेळी , माजी महापौर शिवाजी सुंठकर , माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील , शुभम शेळके , मनोज पावशे , ऍड . सुधीर चव्हाण , ऍड . शाम पाटील , ऍड . प्रसाद सडेकर ,प्रसाद घाडी , शिवाजी कुट्रे , यल्लाप्पा पाटील तसेच ऍड एम जी पाटील यांनी आपले विचार या बैठकीत मांडले .

Tags:

MES MEETING FOR CHABUK MORCH